बदलापूरच्या पीडित चिमुलींच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या तरुणी अटक
By पंकज पाटील | Updated: August 22, 2024 23:25 IST2024-08-22T23:23:10+5:302024-08-22T23:25:41+5:30
बदलापूर येथील दोन चिमुकलीपैकी एका पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृती विषयी बुधवारी रात्री सोशल मीडियावर चुकीची माहिती व गैरसमज पसरवणारे मेसेज पसरवण्यात आला होता.

बदलापूरच्या पीडित चिमुलींच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या तरुणी अटक
बदलापूर : बदलापूर येथील दोन चिमुकलीपैकी एका पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृती विषयी बुधवारी रात्री सोशल मीडियावर चुकीची माहिती व गैरसमज पसरवणारे मेसेज पसरवण्यात आला होता. यामुळे गुरुवारी दिवसभर या अफवेमुळे समाजामध्ये तणाव, असंतोष पसरला होता. त्यानंतर हा मेसेज पसर्वणाऱ्या व्यक्तीचा साइबर सेलच्या पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेतला आहे.
या प्रकरणी बदलापूर येथील चामटोली येथे राहणारी ऋतिका प्रकाश शेलार ( २१ ) या तरुणीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून समाजात अफवा पसरून तणाव, अशांतता पसरवल्या प्रकरणी तिच्यावर बदलापूर पूर्व पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली आहे