‘त्या’ सूत्रधारास अटक
By admin | Published: May 21, 2017 02:06 AM2017-05-21T02:06:11+5:302017-05-21T02:06:11+5:30
येथील महाराष्ट्र बँकेत ५५ लाखाचा व भार्इंदर, ठाणे, घाटकोपर, विरार येथील विविध बँकातून सुमारे ३ कोटी यू पी आय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीद्वारे हडपणाऱ्या मुंबईचा
- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : येथील महाराष्ट्र बँकेत ५५ लाखाचा व भार्इंदर, ठाणे, घाटकोपर, विरार येथील विविध बँकातून सुमारे ३ कोटी यू पी आय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीद्वारे हडपणाऱ्या मुंबईचा मास्टरमार्इंड जतिन संखे याला त्याच्या ३ साथीदारांसह पालघर पोलिसांनी भार्इंदर येथून अटक केली. प्रतिक पद्मनाभ पुजारी, जुगल शहा व राजू दासानिया अशी त्यांची नावे असून ते सर्व भार्इंदरचे आहेत. त्यांना न्यायालयाने आज सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींनी पालघरमधील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेत इतरांच्या नावे त्यांच्या नकळत खाती उघडून व त्यांना स्वत:च्या मोबाइलचे क्र मांक देऊन ते अॅक्टिव्हेट करून घेतले. त्याद्वारे बँकेच्या यूपीआय प्रणालीतून डिसेंबरमध्ये सुमारे ५५ लाख हडप केले. हे जानेवारीत निदर्शनास येताच बँकेने ही प्रणाली तात्काळ बंद केली व संबंधित खातेदारांविरूध्द पोलिसात तक्र ार दाखल केली.
मात्र खरे आरोपी दुसरेच आहेत हे पोलीसांच्या लक्षात आले. तपासात याचा मास्टरमार्इंड जतीन संखे याच्यासह प्रतिक पुजारी, जुगल शहा व राज दासानिया हे ही सामील असून मुंबई-ठाणे परिसरातील अन्य बँकातून याच रितीने ३ कोटी हडप केल्याचे पोलिसांना कळले.
बँकेने ज्या खातेदारांना आरोपी ठरवून पोलिसांत तक्रार दाखल केली त्यांना या प्रकाराची कल्पनाही नव्हती कारण त्यांना अंधारात ठेवूनच ही चौकडी हा गुन्हा करीत होती त्यामुळे आता त्यांच्याविरूध्दच्या तक्रारी मागे घेण्याचे कामही बँकेला करावे लागणार आहे.
या प्रकरणाचा मास्टरमार्इंड आता ताब्यात आल्याने तपास अधिक गतीने होईल.
- संजय हजारे, पो.निरीक्षक