गाणी लावल्याच्या रागातून तरुणावर खुनीहल्ला करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:51 PM2021-06-02T22:51:34+5:302021-06-02T22:53:37+5:30

डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली.

Arrested for killing a youth out of anger over singing songs | गाणी लावल्याच्या रागातून तरुणावर खुनीहल्ला करणाऱ्यास अटक

वर्तकनगर पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईठार मारण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. लोखंडी रॉडने मारल्यानंतरही त्याने नरेशला ठार मारण्याची धमकी दिल्याने संताप व्यक्त होत आहे.
नरेश हा साईनाथनगर येथील पाइपलाइन ब्रिजच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेला होता. त्याच वेळी त्याच्या शेजारी राहणारा रघू उर्फ रघुवीर छाब्रा याने डेकवर भक्तीसंगीत वाजविल्याचा रागातून १ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आधी शौचालयाच्या दरवाजावर त्याने लाथ मारली. नंतर लोखंडी रॉडने दरवाजा ढकलून दिला. ह्यतू फार गाणी वाजवितोस, तू बाहेर ये. मी तुला जिवंत सोडणार नाही,ह्ण असे म्हणत नरेशच्या डोक्यात लोखंडी रॉडने फटका मारून त्याला गंभीर जखमी केले. आपला जीव वाचविण्यासाठी तो तिथून पळून जात असताना, त्याचा पाठलाग करून पुन्हा रिक्षा स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या एका दुकानासमोर लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर दोन वेळा जोरदार प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या पथकाने रघूला मंगळवारी रात्री अटक केली.

Web Title: Arrested for killing a youth out of anger over singing songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.