ठाण्यात दोन पोलिसांवर हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 10:17 PM2018-05-01T22:17:33+5:302018-05-01T22:17:33+5:30

हाणामारीच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात आणलेल्या एका रिक्षा चालकाने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्यात घडली. या घटनेने रिक्षा चालकांची दंडेली पुन्हा एकदा समोर आली आहे.

Arrested rickshaw driver who attacked two police stations in Thane | ठाण्यात दोन पोलिसांवर हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकास अटक

आरोपीला मिळाली न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देरिक्षा चालकांच्या दंडेलीचा प्रश्न ऐरणीवरनरेंद्र शिंदे आणि अरुण परदेशी या दोन पोलिसांवर केला हल्लाआरोपीला मिळाली न्यायालयीन कोठडी

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्यातील नरेंद्र शिंदे आणि अरुण परदेशी या दोन पोलिसांना मारहाण करण-या प्रदीप जाधव (२५, रा. काल्हेर, भिवंडी, ठाणे) या रिक्षाचालकाला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एका हाणामारीच्या गुन्हयात प्रदीप जाधव याला २९ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस हवालदार शिंदे हे त्यांचे कामकाज करीत असतांना प्रदीपला आरडाओरड न करण्याबाबत त्यांनी सुनावले. याचाच राग आल्याने त्याने त्यांना धक्काबुक्कती करुन त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. तर त्यांचे सहकारी पोलीस नाईक परदेशी यांनाही धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीनंतर प्रदीप विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एन. बी. गिरासे हे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Arrested rickshaw driver who attacked two police stations in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.