बेकायदेशीरपणे मद्य विक्र ी करणा-यास अटक: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:48 PM2020-04-20T23:48:15+5:302020-04-20T23:53:50+5:30

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीवर निर्बंध असतांना दुसरीकडे मीरा रोडमधील एका बियर शॉपमधून चढया भावाने बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्यास मुनीबलाल श्रीवास्तव याला ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ६१ हजारांचे मद्य जप्त केले आहे.

 Arrested for selling illicit liquor: Rs. Two Lack 61 thousand liquor seized | बेकायदेशीरपणे मद्य विक्र ी करणा-यास अटक: पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईचढया भावाने सुरु होती विक्र ी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: मीरा रोड भागात बेकायदेशीरपणो मद्य विक्र ी करणा:या मुनीबलाल श्रीवास्तव (४८, रा. बोरीवली) याला ठाणो ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ६१ हजार ७००रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मीरा रोड पूर्व भागातील सिंग बियर शॉपमध्ये लॉकडाऊनच्या काळातही बेकायदेशीर रित्या बियर आण िमद्याची विक्र ी सुरु असल्याची माहिती पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे, विलास कुटे, पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील, जमादार चंद्रकांत पोशिरकर, अनिल वेळे, पोलीस हवालदार संदीप शिंदे, किशोर वाडीले, अविनाश गर्जे, अर्जून जाधव, अशोक पाटील, पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, संजय शिंदे, प्रदीप टक्के, पोलीस कॉन्स्टेबल सशिश जगताप, राजेश श्रीवास्तव, महेश वेल्हे, विकास राजपूत, आणि जयवंत कांडलेकर आदींच्या पथकाने १९ एप्रिल रोजी सापळा रचला. तेंव्हा या शॉपचा व्यवस्थापक श्रीवास्तव हा चढया दराने बियरची विक्र ी करीत असल्याचे आढळले. त्यावेळी त्याच्या ताब्यातून बेकायदेशीरित्या विक्र ीसाठी आणलेल्या विविध कंपनीच्या ९२ बॉक्समधील दोन लाख ६१ हजारांचे मद्यही यावेळी जप्त करण्यात आले. त्याच्याविरु द्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात कोविड १९ उपाययोजना २०२० नियम ११ तसेच साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Arrested for selling illicit liquor: Rs. Two Lack 61 thousand liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.