ठाण्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:11 AM2018-09-18T05:11:06+5:302018-09-18T05:11:44+5:30
मंगतपाल सिंग याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे : फेसबुकच्या माध्यमातून कल्याणच्या विवाहितेशी पंजाबच्या तरुणाने सलगी केली. तसेच ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला होता. मंगतपाल सिंग याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याणच्या या विवाहितेसोबत पंजाबच्या मंगतपाल याने मैत्री कली. त्याने तिला २ आॅक्टोंबर २०१७ रोजी ठाणे रेल्वे स्थानकात बोलविले. तिथे भेट झाल्यानंतर बाळकूम येथील ‘राज रेसिडेन्सी’ या हॉटेलमध्ये शिपींग कंपनीचा मॅनेजर आला असून तुझ्या नोकरीची बोलणी करून देतो, अशी बतावणी केली. हॉटेलात शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्याचे चित्रणही मोबाईलमध्ये केले. ती शुद्धीवर आल्यावर मंगतपाल तिचे चित्रण मोबाईलमध्ये करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. भेदरल्यामुळे तिने याची वाच्यता केली नाही. त्यानंतरही मंगतपाल तिला ब्लॅकमेल करू लागला. अश्लील फोटो पाठवू लागला. या प्रकाराची माहिती तिने एका समाजसेवकाच्या मदतीने १५ जून २०१८ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना सांगितली.
कापूरबावडी पोलिस ठाण्यात मंगतपालविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याचा शोध घेतला. तेंव्हा तो पंजाबमधील त्याच्या मुळ गावी असल्याची माहिती समोर आली. ठाणे पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागल्यानंतर तो सतत घराबाहेर राहू लागला. त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी त्याला १३ सप्टेंबर रोजी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.
नोकरीचे आमिष
कल्याणच्या या विवाहितेसोबत पंजाबच्या राजपूर जिल्ह्यातील मंगतपाल याने मैत्री करून विश्वास संपादनानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांकही मिळविला. तिच्याशी संपर्क साधून तिला कंपनीत रिसेप्शनिस्टची कायम नोकरी लावण्याचेही अमिष दाखविले.