शस्त्रांस्त्रांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीयास ठाण्यात अटक: चार पिस्टल आणि १५ काडतुसे हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 12:53 AM2021-09-04T00:53:00+5:302021-09-04T00:53:47+5:30
पिस्टल विक्रीसाठी आलेल्या लोकेश मूलचंद सेन (३१, रा. गांधवानी, मध्यप्रदेश)याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी राबोडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे चार पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पिस्टल विक्रीसाठी आलेल्या लोकेश मूलचंद सेन (३१, रा. गांधवानी, मध्यप्रदेश)याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने शुक्रवारी राबोडी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे चार पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
मध्यप्रदेशातून एक व्यक्ती पिस्टल विक्रीसाठी ठाण्यात येणार असल्याची टीप मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्यच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोराळे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक होनराव आणि सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे यांच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी साकेत ब्रिजकडून साकेतकडे जाणाºया रस्त्यावर सापळा लावून लोकेश याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीचे चार पिस्तुल आणि १५ काडतुसे जप्त करण्यात आली. तो ठाण्यात कोणाला पिस्तुल विक्र ी करण्यास आला होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सागितले. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.