आदिशक्तीचे जल्लोषात आगमन
By Admin | Published: October 14, 2015 02:41 AM2015-10-14T02:41:47+5:302015-10-14T02:41:47+5:30
आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून ठाणे व पालघर जिल्ह्यात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. गरबा खेळण्यासाठी बच्चे कंपनीबरोबरच युवकांनीही देवी मंडळाच्या ठिकाणी हजेरी लावली
ठाणे : आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून ठाणे व पालघर जिल्ह्यात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. गरबा खेळण्यासाठी बच्चे कंपनीबरोबरच युवकांनीही देवी मंडळाच्या ठिकाणी हजेरी लावली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामुळे घराघरात भक्तीमय वातावरण होते. ५६ प्रकारचे पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी सज्ज होते.
शहरांमधील गाव देवीच्या मंदिरातही भक्तांनी गर्दी केली होती. देवीला पहिली फुलांची माळ मंगळवारी बांधण्यात आली.
भिवंडी शहरात ७९ सार्वजनिक देवी आणि २२८ खाजगी दवींचे आगमन झाले आहे. तर कल्याण शहरात १३३ सार्वजनिक देवी आणि १६३ खाजगी देवींचे आगमन झाले आहे. तर घरगुती घटांचे प्रमाण देवीच्या मूर्ती स्थापनेच्या तुलनेत अधिक आहे.
मुंब्रादेवीच्या उत्सवाला सुरु वात
ठाणे जिल्हा तसेच मुंबईतील उपनगरा मधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंब्रादेवीच्या उत्सवाला मंगळवारपासून उत्सवात सुरु वात झाली. मुंब्रा रेल्वे स्थानका समोरील डोगरावर वसलेली, वैष्णोदेवीच्या मुखकमलाशी साधर्म असलेली ही सर्वधर्मीय देवी भक्तांच्या हाकेला धावून येते अशी भक्तांची श्रद्धा आहे.
नवरात्री च्या नऊ दिवसांमध्ये पहाटे पासून या देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. उत्सवा निमित्त मंदिराचे प्रवेशद्वार तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.