अभिनय कट्ट्यावर ४० कलाकारांची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:43 AM2017-08-01T02:43:41+5:302017-08-01T02:43:41+5:30

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील सादरीकरण ३३५ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

Art of 40 artists on acting | अभिनय कट्ट्यावर ४० कलाकारांची कला

अभिनय कट्ट्यावर ४० कलाकारांची कला

googlenewsNext

ठाणे : हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील सादरीकरण ३३५ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. एकपात्री, फिल्मी चक्कर आणि त्यानंतर गुलाम अशी या कट्ट्याची रूपरेषा होती. या कट्ट्यावर एकूण ४० कलाकारांनी आपली कला सादर केली.
आदित्य नाकती दिग्दर्शित ‘गुलाम’ या सादरीकरणात सहदेव साळकर, शुभम चव्हाण, मयूरेश जोशी या कलाकारांनी अभिनयाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलवली. यात सध्या या गाजत असलेल्या ‘वंदे मातरम्’च्या प्रकरणावर परखडपणे भाष्य करण्यात आले. या कट्ट्याची प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताची धुरा अनुक्रमे वैभव जाधव आणि संदीप पाटील यांनी सांभाळली. सुरुवातीला अर्चना वाघमारे हिने ‘न जीवनम् जीवनम् मरहती’, हितेश नेमाडेने ‘नथुराम गोडसे’, रुक्मिणी कदम यांनी ‘काहूर’, ऐश्वर्या कांबळेने ‘गुरू नव्हे गुरु जी’, तर न्युतन लंकेने ‘पोरकी’ या एकपात्री सादर केल्या. त्यानंतर, ‘फिल्मी चक्कर’ या सदरात हितेश व दीपक मुळीक यांनी ‘प्यार किये जा’, रु क्मिणी आणि स्वप्नील माने यांनी ‘बिवी हो तो ऐसी’, वैभवी वंजारे, वीणा छत्रे यांनी ‘देवदास’, तर योगेश मंडलिक, आतिश जगताप यांनी ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटांतील प्रसंग हुबेहूब सादर केले. शिवानी देशमुखने ‘दामिनी’, कल्पेश डुकरे व अभिषेक सावळकर यांनी ‘आनंद’, सिद्धान्त छत्रेने ‘ईश्वर’, सुरज परब, प्रशांत सकपाळ, प्रणव दळवी व वैभव जाधव यांनी ‘फिर हेरा फेरी’, परेश दळवी आणि संकेत देशपांडे यांनी अनुक्र मे उत्पल दत्त आणि अमोल पालेकर यांच्या भूमिका वठवल्या. संदीप पाटील, तेजस कचरे, प्रणव दळवी, प्रेमराज लोटे यांनी ‘अंदाज अपना अपना’, शुभांगी गजरे आणि आरती ताथवडकर यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, निलेश पाटील याने ‘चक दे इंडिया’मधील कबीर खान दमदारपणे वठवला. त्यानंतर कदीर शेख, नवनाथ कंचार, अर्चना वाघमारे यांनी ‘पिके’ चित्रपटातील प्रसंग उत्कृष्टरीत्या सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

Web Title: Art of 40 artists on acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.