शेती करत जोपासली कला

By admin | Published: August 17, 2016 03:04 AM2016-08-17T03:04:42+5:302016-08-17T03:04:42+5:30

कर्जत म्हणजे कलाकारांची नगरी विशेषत: या नगरीत एका पेक्षा एक चित्रकार आहेत.

Art of doing farming | शेती करत जोपासली कला

शेती करत जोपासली कला

Next

कर्जत : कर्जत म्हणजे कलाकारांची नगरी विशेषत: या नगरीत एका पेक्षा एक चित्रकार आहेत. बहुतेकांची चित्रे साता सामुद्रा पार गेली आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा नवोदित चित्रकार आपला ठसा उमटवीत आहेत. यापैकी अनेकांची चित्र प्रदर्शने मुंबईत आयोजित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अवघ्या सातव्या इयत्तेपर्यंत शिकलेला व परंपरागत शेती व्यवसाय करणारा कोणतेही चित्रकलेचे शिक्षण घेतलेला एक चित्रकार हरी फुलावरे याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटरच्या वातानुकूलीत कला दालनात सुरु आहे.
कर्जत तालुक्यातील बीड गावामध्ये जेम तेम सातवी पर्यंत शिक्षण घेतलेला हरी फुलावरे विडलांबरोबर शेती व्यवसाय करीत होता. सात आठ वर्षांपूर्वी कर्जतमधील अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे निसर्ग चित्र साकारण्यासाठी बीड गावाच्या परिसरात गेले होते त्यावेळी हरीची व त्यांची भेट झाली. त्यावेळी हरीने आपल्या कल्पकतेने बोरसे यांना त्या परिसरातील निसर्गाच्या विविध ठिकाणांची माहिती करून दिली. पराग बोरसे बीड गावाच्या परिसरात जाऊन चित्र काढून त्यांना वेगवेगळे रंग देऊ लागले. ही त्यांची कला मोठ्या कुतुहलाने हरी पहात असे व त्यावर विचार करीत असे. दोघांची मैत्री झाली, या सगळ्या घटनांनी हरी मधील कलाकार जागा झाला. त्याने आपली कला प्रत्यक्ष कन्हवासवर उतरविली आणि बोरसे यानां दाखिवली. हरीची कला पाहून बोरसे अक्षरश: थक्क झाले. मैत्रीचे रु पांतर गुरु शिष्यामध्ये कधी बदलले हे समजलेच नाही. त्यानंतर हरी शेती व्यवसाय सांभाळून आपली कला विकिसत करू लागला बोरसे त्याला मार्गदर्शन करू लागले आणि हरीला मुंबईत चित्र प्रदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाली.
आता ‘अनकॉट ब्युटी’ हे चित्र प्रदर्शन प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटरच्या वातानुकुलीत कला दालनात सुरु आहे. सुंदर निसर्ग, देखण्या बागा, डौलदार बैलगाडी, विविध गावातील जीवन संस्कृती अशी अनेक चित्रे हरीने या प्रदर्शनात मांडली आहेत. निरीक्षण शक्ती, मार्गदर्शन आणि मेहनतीतून त्यांनी हे यश संपादित केले. (वार्ताहर)

Web Title: Art of doing farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.