आदिवासी संस्कृतीची कला,क्रीडा महाेत्सव गणेशपुरीत रंगला!
By सुरेश लोखंडे | Published: February 18, 2024 06:56 PM2024-02-18T18:56:08+5:302024-02-18T18:57:43+5:30
शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येत आहे.
ठाणे: आदिवासी संस्कृती जोपासली जावी आणि तिचा सर्वदूर प्रसार व्हावा, या उद्देशातून दोन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक व कला क्रिडा महोत्सव शनिवारपासून भिवंडीच्या गणेशपुरी भिवाळी येथाील मैदानावर रंगल्याचे आयाेजक आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी स्पष्ट केले. या महाेत्सवात आदिवासी सांस्कृतिक, कला आणि मैदानी खेळाचा आनंद नागरिकांना घेता आला.
आदिवासी जनजीवन, आदिवासी कसे राहायचे, निसर्ग देखावा, त्यांची संस्कृती, पर्यावरणाची निगा कशी राखावी, तारपा गवत्या, धुमश्या, नृत्य आदी नृत्य कला या महाेत्सवात लाेकांचे मनाेरंजन करून आदिवासी संस्कृिती जतन केली जाणार आहे. या प्रख्यात गायक जगदीश पाटील, वैष्णवी पाडेकर, दयानंद म्हस्कर यांची विशेष उपस्थिती आहे. या ठिकाणी जुन्या अवजारांचेही प्रदर्शन लावण्यात आले आहे. या महोत्सवा दरम्यान सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येत आहे.