डोंबिवलीतील पदपथावर कमानींचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:25 AM2019-08-27T00:25:08+5:302019-08-27T00:25:13+5:30
चालायचे कसे? : पादचाऱ्यांनी विचारला सवाल, मंडपांमुळेही रस्ते अडले
डोंबिवली : खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालक , पादचारी यांना चालणे मुश्कील होऊन बसले आहे. त्यात आता गणेशोत्सवानिमित्त उभारल्या जाणाºया कमानींमुळे पदपथावर अडथळा निर्माण होत असल्याने आम्ही चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या वाहतूककोंडीचा सामना करताना पादचाºयांसाठी पदपथ सोयीचे ठरत असले तरी नियम धाब्यावर बसवून कमानी उभारणाºयांवर केडीएमसी कारवाई करणार की कानाडोळा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहरात गेल्यावर्षी गोकुळाष्टमीला उभारलेल्या कमानी दिवाळीपर्यंत कायम होत्या. परवानगी घ्या आणि शहर विद्रूप करा, असे धोरण यंदाही केडीएमसीने स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर मंडप आणि कमानी उभारणीसाठी नियमावली प्रशासनाकडून जाहीर केली असली तरी कारवाईअभावी ते नियम कागदावरच राहत आहेत.
पश्चिमेकडील महात्मा फुले रोडलगतच्या भागात अर्धा रस्ता मंडपाने व्यापलेला आहे. दरवर्षी हे चित्र कायम असते. तो रहदारीचा चौक असल्याने तेथे नेहमीच वाहतूककोंडी होत असते. त्यात मंडपाची भर पडते. दरम्यान, यावेळेलाही काही ठिकाणी लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना काही कमानींनी पदपथाचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पूर्वेकडील छेडा पथावरील स.वा. जोशी हायस्कूलच्या चौकात उभारलेल्या लोखंडी कमानीने पदपथावर अतिक्रमण केले आहे. सध्या पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने येथील नजीकच्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसह अन्य वाहनांची वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे या चौकात प्रचंड कोंडी होत आहे. यात पादचाºयांकडून पदपथाचा वापर केला जातो. परंतु, आता त्यावरच कमान उभारल्याने चालायचे कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.