ठाण्यात कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकृती केंद्राला भक्तांची पसंती
By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2022 08:36 PM2022-09-02T20:36:49+5:302022-09-02T20:37:01+5:30
दीड दिवसांच्या ११ हजार ६०२ मूर्तींचे विसर्जन : ४४५ नागरिकांचे ऑनलाईन बुकिंग
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गुरुवारी भक्तीमय वातावरणात पार पड़ले. यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या ११ हजार ६०२ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाकरिता ठाणे महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनास भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये एकूण ३१६ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन झाले.
विसर्जनासाठी ठाणे शहरात ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा दिली होती. त्यात ४४५ नागरिकांनी बुकिंग करून विसर्जन केले. यंदाही नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले.