बदलापूरमध्ये कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:29 AM2019-09-18T00:29:33+5:302019-09-18T00:29:36+5:30
बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे.
बदलापूर : बदलापूरजवळील महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाच्या बारवी धरणाची उंची चार मीटरने वाढवण्यात आली आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्याचवर्षी बारवी धरण १०० टक्के भरले आहे. या नव्या क्षमतेनुसार बारवी धरणातील पाणी साठाही दुप्पट झाला आहे. मात्र बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाण्यातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कारभारमुळे धरणातील अतिरिक्त पाण्यापासून बदलापूरकर वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील काही अधिकाºयांच्या भोंगळ कारभारामुळे आज अतिरिक्त पाणी असतानाही ते बदलापूरमधील नागरिकांना मिळू शकत नाही. कारण अमृत योजनेतील दुसºया टप्प्यातील पाण्याच्या टाक्या नव्याने बांधणे, नव्याने पाइपलाइन टाकणे यासारखी अनेक महत्वाची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहेत. या प्रकाराला सर्वस्वी ठाण्यातील मुख्य अभियंत्यांचे कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला आहे.
बदलापूर शहारासाठी बारवी धरणातून ५० एमएलडी पाण्याच्या आरक्षणास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र पाणी वितरण करण्यासाठी लागणारी व्यवस्था तयार करण्यात जीवन प्राधिकरण अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता यंदाच्यावर्षी बदलापूरकरांंना बारवी धरणातील अतिरिक्त पाणी मिळणार नाही. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या नावाने खडे फोडण्यास सुरूवात केली आहे.
>नागरिकांकडून सडकून टीका
आधीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या बदलापूरकरांंसाठी जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचा आरोपही कथोरे यांनी केला आहे. एकूणच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारावर आता बदलापूरमधून सडकून टीका होत आहे.