भाजपचा नेता असल्याची बतावणी करून कलाकारास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:44+5:302021-07-07T04:49:44+5:30
मीरा रोड : दुकान उद्घाटनावेळी केलेल्या इव्हेंट डेकोरेशनच्या कामाचे शिल्लक पैसे मागितले म्हणून एका कलाकाराला भाजप नेता असल्याचे धमकावत ...
मीरा रोड : दुकान उद्घाटनावेळी केलेल्या इव्हेंट डेकोरेशनच्या कामाचे शिल्लक पैसे मागितले म्हणून एका कलाकाराला भाजप नेता असल्याचे धमकावत बेदम मारहाण केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयनगर भागात राजेंद्र मिश्रा याने रियल इस्टेट एजन्सीच्या उद्घाटनासाठी स्टेज आर्टिस्ट श्रवण गुप्ता यांस २२ हजारांत काम दिले होते. थोडे थोडे करून गुप्ता याला त्यांनी १२ हजार रुपये दिले. उर्वरित पैसे मागितले असता मिश्राने शिवीगाळ आणि धमकी दिली. त्यानंतर पैसे घेण्यासाठी काशिमीरा येथे बोलावून गुप्ता यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून मिश्रा यांच्या ऑफिसमध्ये नेले. भाजपचा नेता म्हणवणाऱ्या राजेंद्र मिश्रासह दीपक सिंग, निशांत मिश्रा व दुकानात काम करणाऱ्या यादव या तिघांनी मिळून श्रवण गुप्ता याला बेदम मारहाण केली. पोलीस आल्यामुळे जीव वाचला, असे गुप्ता म्हणाले.