ऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत आर्या - अश्वजितची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 03:03 PM2020-12-09T15:03:03+5:302020-12-09T15:05:17+5:30

कोरोनामुळे ऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न झाली.

Arya - Ashwajit's baji in online state level solo acting competition | ऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत आर्या - अश्वजितची बाजी

ऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत आर्या - अश्वजितची बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्नअभिनय स्पर्धेत आर्या - अश्वजितची बाजीदोन गटांत घेण्यात आली होती स्पर्धा

ठाणे : अभिनय कट्टा आयोजित राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा कोरोनामुळे यंदा ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धेत लहान गटातून मुंबईच्या आर्या मोरेने तर मोठ्या गटातून नवी मुंबईच्या अश्वजित सावंतफुले यांनी बाजी मारली.

अभिनय कट्टा गेली अनेक वर्षे सातत्याने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा घेत आला आहे.अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते, ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात.आपली कला सादर करतात यंदा हे कोरोनाचे संकट लक्षात घेऊन अभिनय कट्ट्याने ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली होती असे स्पर्धेचे आयोजन किरण नाकती यांनी सांगितले. ५ ते १५ लहान गट तर १६ ते पुढील अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. लहान गटात एकूण सहा तर मोठ्या गटात एकूण आठ अशी पारितोषिके देण्यात आली. ह्या स्पर्धेत मोठ्या गटात एकूण ६५ स्पर्धकांनी तर लहान गटात एकूण ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

-------------------------------------------------

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

लहान गट

प्रथम क्रमांक (रोख रक्कम १५०० व प्रमाणपत्र):-आर्या मोरे(चेंबूर,मुंबई) द्वितीय क्रमांक (रोख रक्कम १००० व प्रमाणपत्र):-अर्चित नाईक (भांडुप) तृतीय क्रमांक (रोख रक्कम ७५० व प्रमाणपत्र) (विभागून) :- स्वरा जोशी (ठाणे), प्रज्ञा साबळे (बदलापूर) उत्तेजनार्थ (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-आस्था महाजन (भांडुप) (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):- ईश्वरी संजय पाटील (अकोला)

--------------------------------------------

मोठा गट

प्रथम क्रमांक (रोख रक्कम २००० व प्रमाणपत्र):-अश्वजित सावंतफुले (उळवे, नवी मुंबई) द्वितीय क्रमांक (रोख रक्कम १५०० व प्रमाणपत्र):-सखी गुडये (वरळी, मुंबई) तृतीय क्रमांक (रोख रक्कम १००० व प्रमाणपत्र):-संतोष पालव (विक्रोळी) उत्तेजनार्थ (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-सिद्धेश शिंदे (ठाणे) (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-सपना गुरुराज (सांगली)(रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-निशांत सूर्यवंशी (भांडुप) (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-आदर्श उबाळे (ठाणे) (रोख रक्कम ५०० व प्रमाणपत्र):-भटू चौधरी (धुळे)

Web Title: Arya - Ashwajit's baji in online state level solo acting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.