आश्रमशाळा कर्मचारी मानधनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:44 AM2017-07-29T01:44:09+5:302017-07-29T01:44:11+5:30
आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाºया या शाळांमध्ये गट ‘क’ व ‘ड’ श्रेणींत अनेक वर्षांपासून रोजंदारीतत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वाढीव दरपत्रकाप्रमाणे मानधन मिळणार असल्याने कर्मचाºयांमध्ये समाधान आहे.
भातसानगर : आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून चालवल्या जाणाºया या शाळांमध्ये गट ‘क’ व ‘ड’ श्रेणींत अनेक वर्षांपासून रोजंदारीतत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वाढीव दरपत्रकाप्रमाणे मानधन मिळणार असल्याने कर्मचाºयांमध्ये समाधान आहे.
शासनाच्या आदिवासी प्रकल्पांतर्गत असलेल्या शाळा आणि कार्यालयात अनेक वर्षांपासून गट क आणि ड मध्ये काम करणारे प्रशिक्षित, अप्रशिक्षित शिक्षक, पुरुष अधीक्षक आणि अधीक्षिका, स्वयंपाकी, कामाठी, सफाई कामगार, शिपाई तासिकातत्त्वावर काम करत होते. मात्र, त्यांच्या मानधनात वाढ होत नव्हती. ती वाढ होण्यासाठी अनेक संघटना अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी करत होत्या.
६ एप्रिल २०१७ रोजी या संघटनांचे पदाधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत मानधनवाढीला मान्यता मिळाल्याचे रोजंदारी वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, सचिव कमलाकर पाटील, शहापूर तालुकाध्यक्ष संतोष लाटे यांनी सांगितले. त्यानुसार, शासनाने ७ जून २०१७ रोजी परिपत्रक काढून नवीन मानधन लागू केले आहे. दरम्यान, सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेत त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.