लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल
By नितीन पंडित | Published: February 8, 2024 04:27 PM2024-02-08T16:27:29+5:302024-02-08T16:27:43+5:30
महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे.
भिवंडी: गटप्रवर्तक व आशा सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च बुधवार पासून काढण्यात आला आहे. गुरुवारी हा लॉन्ग मार्च भिवंडीत दाखल झाला असून उन्हाच्या झळा वाढल्याने लॉंग मार्च मधील आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. या आशा स्वयंसेविका चक्कर आल्याने त्या बेशुद्ध झाल्या.
२७ आशा सेविकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात या अशा सेविकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यातील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात असून या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. वाढीव मानधन व दिवाळी भाऊबीज मिळावी यासाठी हा मोर्चा निघाला होता.
शहापूर येथून निघालेला मोर्चा गुरुवारी मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे गावच्या हद्दीत आला असता ही उष्माघाताची घटना घडली आहे. महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे.
उष्माघाताने उपचारासाठी दाखल आशा व गट प्रवर्तक महिलांची नावे...
लता बाळकृष्ण दामसे
मीना दिलीप ठाकरे
साधना हरड
प्रतीक्षा ठाकरे
आनंदी मंगेश सोंगा
शारदा विषे
प्रतीक्षा डोहळे
सीमा राजू भला
भक्ती बळीराम राऊत
विशाखा पाटील
अंकिता किसले
संगीता लुटे
वंदना कबाडे
प्रमिला जाधव
रंजना बोरकर
आम्रपाली पंडित
प्रतिभा सूर्यवंशी
संगीता काशीकर
वंदना इंगळे
पूजा कांबळे
सुनंदा जाधव
प्रियंका क्षीरसागर
माया मोरे
मनिषा पवार
कांचन म्हसकर
इरोपा सोनवणे
ललिता रोकडे