अशोक खळदकर यांचे निधन
By admin | Published: May 6, 2015 04:54 AM2015-05-06T04:54:32+5:302015-05-06T04:54:32+5:30
जनसंघ- भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आणि कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जावई अशोक खळदकर यांचे सोमवारी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
डोंबिवली : जनसंघ- भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आणि कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जावई अशोक खळदकर यांचे सोमवारी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला खळदकर (६४), अर्चना अभय नाईक आणि मेघना श्रीराम कुडुस्कर या दोन मुली आणि नातू असा परिवार आहे.
डोंबिवलीतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समर्थ संप्रदायाचे अप्पा धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, प्रिती सरदेशपांडे आदींसह प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मनसेचे नगरसेवक राजन मराठे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते
नानासाहेबांसोबत खळदकर यांनी रामदास स्वामींच्या उपासना मार्गात अनेकांना मार्गदर्शन केले.त्यांचा जन्म सासावड येथिल एकतपूर येथे नोव्हेंबर १९४२ मध्ये झाला होता. बेस्ट मधील नोकरी निमित्त ते डोंबिवलीत १९६५ वास्तव्याला आले. तेव्हापासून ते डोंबिवलीकरच झाले. नानासाहेबांचे जावई या बरोबरच पूर्वीच्या जनसंघाचे-भाजपाचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ख्याती होती. १९७४ मध्ये डोंबिवली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते.