एल्फिन्स्टनच्या घटनेवरचा उद्वेग आपल्या संगीतात का नाही?, आशुतोष जावडेकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:57 AM2017-10-03T00:57:37+5:302017-10-03T00:58:15+5:30

आपल्या संगीतात विद्रोही संगीताची परंपराच नाही. नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेवर आपल्या संगीतात तो उद्वेग का होत नाही, असा सवाल लेखक आशुतोष जावडेकर यांनी केला.

Ashutosh Javadekar's question about Elphinstone's incident? | एल्फिन्स्टनच्या घटनेवरचा उद्वेग आपल्या संगीतात का नाही?, आशुतोष जावडेकर यांचा सवाल

एल्फिन्स्टनच्या घटनेवरचा उद्वेग आपल्या संगीतात का नाही?, आशुतोष जावडेकर यांचा सवाल

googlenewsNext

ठाणे : आपल्या संगीतात विद्रोही संगीताची परंपराच नाही. नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेवर आपल्या संगीतात तो उद्वेग का होत नाही, असा सवाल लेखक आशुतोष जावडेकर यांनी केला.
मॅजेस्टीक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफले, ते जावडेकर यांनी. सावरकर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या सांगीतिक गप्पा रंगल्या. पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आताच्या संगीताकडे पाहिले तर गीतकार चांगले आहेत; पण गडकरींच्या गाण्यातील ‘तुटणारा पदर’ आढळत नाही. आपला संगीत प्रवास उलगडताना ते म्हणाले, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे. जो सुरांचा लोभी आहे. शब्द-स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत.
उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. तो अनेक गायकांना नाही. ऐकणे हा पहिला रियाज असतो. मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल, तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो, तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशननिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शून्यातून निर्माण होत नाही. गाणे ही ऐकण्याबरोबर बघण्याचीदेखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेलेदेखील असते. दृश्यकला आणि श्रवणकला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इंडिपेंडंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझिक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणाºया चांगल्या गोष्टी या परभाषिकांपर्यंत पोहोचाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे, तर गाणेही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते, हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगीतिक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचीतला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. काही गाणी भयंकर असतात; पण आपण हा विचार करावा, जी गाणी कर्णकटू वाटतात, ती ऐकण्याची मर्यादा आपली कुठे संपतेय का? ज्यांना पाश्चात्त्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल, त्यांनी कंट्री संगीतापासून सुरुवात करावी. पाश्चात्त्य संगीत हे वाईट नसतंच. चांगले गाणे हे जगण्याच्या इतके जवळ येते की, त्याचे नुसते विश्लेषण करून चालत नाही. शब्दांची समीक्षा करताना शब्द वापरतात, मग सुरांची समीक्षा ही सुरांनीच व्हायला हवी. अर्थात, ते सर्वांना जमेलच असे नाही. म्हणून, सुरांची समीक्षा शब्दांनी केली जाते. संगीताच्या लोकशाहीकरणामध्ये समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. गाणे आवडले की, आपण ते लगेच शेअर करतो. स्वतंत्र गायक, लेखक, कवी यांना त्याचा खूप फायदा झाला आहे. आपल्या आयुष्यात गाणे हे खंबीरपणे उभे असते. ते एक मित्रासारखे असते. त्या मित्राची आपल्याला जाणीव असली, तरी ती पुसट होते; पण मित्र मात्र ताकदीचा असतो. गाण्यातील अंतरीची खूण पटते. तुम्ही गायक असा किंवा नसा, गात मात्र जा, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Ashutosh Javadekar's question about Elphinstone's incident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.