आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेचा CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

By जितेंद्र कालेकर | Published: June 5, 2023 09:25 PM2023-06-05T21:25:52+5:302023-06-05T21:26:11+5:30

प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे हस्ते  पार पडले.

Asia's largest cluster development scheme launched by CM Eknath Shinde | आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेचा CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेचा CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

googlenewsNext

ठाणे :  आशिया खंडातील सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजनेचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  पार पडले.

या कार्यक्रमास ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, उद्योग मंत्री, रवींद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा सोहळा वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथे  पार पडला  आहे.

अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे.या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ - 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढया जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी  सिडको  या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे हस्ते  पार पडले.

Web Title: Asia's largest cluster development scheme launched by CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे