भिवंडीत अतिक्रमणाची नोटीस मागे घेण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांना साकडे
By नितीन पंडित | Published: November 28, 2022 05:36 PM2022-11-28T17:36:58+5:302022-11-28T17:40:49+5:30
भिवंडी - शहरातील कणेरी-फुलेनगर येथील जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडून कणेरी-फुलेनगर परिसरातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात करण्यात आली आहे.मात्र येथील ...
भिवंडी - शहरातील कणेरी-फुलेनगर येथील जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडून कणेरी-फुलेनगर परिसरातील रहिवाशांना नोटीस बजावण्यात करण्यात आली आहे.मात्र येथील रहिवासी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहत असल्याने याबाबत महासंघ कृती समितीच्या वतीने ही नोटीस मागे घेण्यासाठी सोमवारी भिवंडी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना साकडे घातले असून अतिक्रमनांसंदर्भातील नोटीस मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कामतघर मानसरोवर परिसरातील जेतवन बुद्ध विहार-फुलेनगर नं.१ येथील सर्व्हे नं. ५८ या गुरुचरण जमिनीवर अनुसूचित जाती,जमाती यांची वडिलोपार्जित घरे आहेत.तसेच ५० वर्षांपूर्वी येथील रहिवाश्यांचे कुटुंबीय काम करून वास्तव्यास होते,तर येथील दलित रहिवाश्यांच्या पिढ्यांपिढ्या फुलेनगरमध्ये राहत असून येथे पूर्वी कच्या स्वरूपाची मात्र आता विटांची पक्की घरे बनवली असून घरांना महापालिकेने घर नंबर दिले असून येथील रहिवाश्यांनी प्रशासनास फुलेनगरमध्ये पूर्वीपासून राहत असल्याचे पुरावेही सादर केले आहेत.त्यामुळे संबंधित विभागाने ही घरे निष्कासित करू नये आणि अतिक्रमणाची नोटीस रद्द करावी अशी विनंती महासंघ कृती समितीचे सुनिल वाघमारे,बबन घोडके,मेघराज वाघमारे,भिष्मा हजारे यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.