अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:48 PM2020-12-14T23:48:51+5:302020-12-14T23:48:57+5:30

बळीराजा मेटाकुटीस: आधी दडी, मग अतिवृष्टी आणि आता ‘अवका‌ळी’

Asmani Sankat leaves no trace for farmers in Palghar! | अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

googlenewsNext

n  लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी संकट लागले आहे. पेरणीला पावसाने ओढ दिली, लावणीला पुन्हा दडी मारल्याने ती खोळंबली, सप्टेंबरनंतर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके आडवी होऊन कुजू लागली, तर आता थोडे-फार हाती आलेले आणि खळ्यावर गोळा केलेले पीक मळणी करून धान्य घरात आणत असताना, पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सतत तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
पालघर जिल्ह्यात खरीपाचे १ लाख ५ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भातशेतीचे ७५ हजार, १५ नागली, वरईचे १० हजार, तर इतर पिकाचे ५ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुख्य पीक भाताचे घेतले जाते. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. थोडे-फार राहिलेले पीक आता भिजून वाया गेले. या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसान भरपाईची अंमलबजावणी शासनाने केली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खळ्यातील गंजीवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले, मात्र पिक भिजलेच. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून अखेरपर्यंत अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.

‘सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी’ 
डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असताना अवकाळी पावसामुळे हवामानातील गारवा व आर्द्रता अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सध्याच्या या विचित्र अशा हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात कोरोना फैलावत असून, नागरिकांनी त्या दृष्टीने या का‌ळात आपापल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सर्वांना केले आहे.  

Web Title: Asmani Sankat leaves no trace for farmers in Palghar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.