भरपावसात मीरा-भाईंदर रस्त्यावर डांबराचे पॅचवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:14 AM2020-09-12T01:14:32+5:302020-09-12T01:14:36+5:30

मीरा- भाईंदर महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारास गेल्या वर्षी तब्बल ३५ कोटी रु पयांचे पॅचवर्कचे काम दिलेले आहे.

Asphalt patchwork on Mira-Bhayander road in return | भरपावसात मीरा-भाईंदर रस्त्यावर डांबराचे पॅचवर्क

भरपावसात मीरा-भाईंदर रस्त्यावर डांबराचे पॅचवर्क

Next

भाईंदर : डांबर आणि पाण्याचा ३६ चा आकडा मानला जात असला तरी मीरा- भार्इंदर महापालिका व ठेकेदार मात्र भर पावसात खड्डे बुझवण्यासाठी डांबरी पॅचवर्कचे काम करत असल्याचा प्रकार शहरात सुरु आहे. आधीच रस्ते बांधणी व पॅचवर्कचे काम निकृष्ट असल्याचा आरोप होत असताना भर पावसात पॅचवर्क कामामुळे पालिकेचे पितळ उघडे पडले आहे .

मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारास गेल्या वर्षी तब्बल ३५ कोटी रु पयांचे पॅचवर्कचे काम दिलेले आहे. यंदा तर निविदा प्रक्रि येत वेळकाढूपणा झाल्याने आधीच्याच ठेकेदारास पॅचवर्ककामाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅचवर्कचे काम हे पडलेला खड्डा खोदण्यापासून त्यावर किती डिग्रीचे डांबर आदी आवश्यक साहित्य वापरायचे या बाबतचे तांत्रिक निकष आहेत. परंतु शहरात मात्र पॅचवर्कचे काम म्हणजे केवळ थुकपट्टी असल्याची म्हण प्रचलित झालेली आहे . कारण साहित्याचा दर्जा आणि तांत्रिक मानांकनानुसार काम केले जात नसल्याचे आरोप हे सातत्याने केले जात आहेत .

पॅचवर्क पुन्हा उखडून खड्डे पडले वा सर्वत्र खडी धूळ पसरल्याचे प्रकार ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यातच शहरात शुक्र वारी पाऊस पडत असताना भर पावसात पॅचवर्कचे काम केले जात होते. हे पॅचवर्ककिती टिकेल या बद्दल साशंकता व्यक्त होत आहे . कारण खड्ड्याच्या ठिकाणी योग्य तेवढा खड्डा खोदून त्यात निर्देशानुसार साहित्य वापरायला हवे . तसेच डांबरची उष्णता देखील ठराविक डिग्रीवर हवी. पण पावसात केलेल्या याकामामुळे डांबर टिकणारच नसल्याने पॅचवर्क म्हणजे केवळ ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी असल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: Asphalt patchwork on Mira-Bhayander road in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.