प्रतिनियुक्त सहाय्यक आयुक्त द्या!

By admin | Published: March 15, 2017 01:52 AM2017-03-15T01:52:31+5:302017-03-15T01:52:31+5:30

वसई विरार महापालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त नेमावेत अशी मागणी भाजपच्या नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Assign deputy commissioner! | प्रतिनियुक्त सहाय्यक आयुक्त द्या!

प्रतिनियुक्त सहाय्यक आयुक्त द्या!

Next

वसई : वसई विरार महापालिकेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त नेमावेत अशी मागणी भाजपच्या नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महापालिकेने सद्या वरिष्ठ लिपीकांना सहाय्यक आयुक्त बनवले आहे. मात्र, त्यांना कामाकाजाची पुरेशी माहिती नाही. त्यांची शैैक्षणिक पात्रताही नाही. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतो. सत्ताधारी मनमानी करून घेतात. म्हणूनच महापालिकेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त नेमावेत अशी त्यांची मागणी आहे.
नालासोपारा परिसरात आरक्षणात असलेल्या राखीव आणि सरकारी जागांवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. शहरात सरकारी हॉस्पीटल नसल्याने गरीब रुग्णांना महागडा उपचार घ्यावा लागत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करावे. (वार्ताहर)

Web Title: Assign deputy commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.