मुंबईच्या रिजवी महाविद्यालयाकडून कोल्हापूर अन् सांगलीतील पुरग्रस्तांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:17 PM2019-09-13T21:17:45+5:302019-09-13T21:18:26+5:30
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्व-इच्छेने केली मदत
मुंबई - बांद्रा येथील रिज़वी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अख़्तर हसन रिज़वी व डायरेक्टर ऍड. रुबीना अख़्तर हसन रिज़वी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्व-प्रेरणा निधितुन कोल्हापुर व सांगलीच्या पुरग्रस्तांना जीवनोपयोगी वस्तु देण्यात आल्या. त्यामध्ये साखर, तांदूळ, दाळ, गह्वाचे पीठ, तेल, मीठ, चहा पत्ती, दूध पावडर, बिस्किट पैकेट, निरमा, साबन, टूथब्रश, टूथपेस्ट, टॉवेल, सैनेटरी पैड, ब्लैंकेट, कपड़े इत्यादि किरानामालासह जीवनोपयोगी वस्तु देऊन त्यांच्या दु:खाचे सांत्वन करण्यात आले.
महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजने चे समन्वयक डॉ. शेख अन्सारपाशा हे स्वतः कोल्हापुरातील कुरुंदवाढ जवळील हेरवाढ/खेरवाड़ या गावी जाऊन वरील सर्व वस्तु गरजु पर्यंत पोहोचविल्या. यामध्ये मुंबई विद्यापीठ येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे डायरेक्टर सुधीर पोराणिक व मुंबई उपनगरीय समन्वयक सुशील शिंदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या डॉ. अंजुम आरा, उपप्राचार्य डॉ. अशफ़ाक़ खान व फराना खालिद वाली, रासेयो च्या शहनाज़ खान, तसेच सर्व प्राध्यापक मंडळीचे मोलाचे योगदान लाभले.