गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार - सहाय्य्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 04:21 PM2018-02-15T16:21:52+5:302018-02-15T16:22:57+5:30
संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केले.
मीरारोड - संगणक व तंत्रज्ञानाच्या युगातील गुन्हे उघड करण्यासाठी संगणक शास्त्रातील विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत . या विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन तांत्रिक पद्धतीचा वापर करू असे प्रतिपादन भाईंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शंकर नारायण महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी बोलताना केले.
काळा नुसार आता गुन्हे व गुन्ह्यांची पद्धत देखील बदलली आहे . परंतु अश्या प्रगत , तंत्रज्ञान वापराने केलेल्या वा सायबर गुन्ह्यांचा तपास करणे जुन्या पोलिसांना थोडे अडचणीचे होत आहे. पण मी स्वतः इंजीनियरिंग विभागाचा विद्यार्थी असल्याने संगणक शास्त्रातील पदवी व पदवीधर विद्यार्थ्यांच्या मदतीने नवनवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करून आधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करत आहोत . त्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढत आहे.
करिअर गाईड्स वर बोलताना त्यांनी युपीएससी आणि एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. विद्यार्थ्यांचे आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस आदी अधिकारी व्हायचे स्वप्न असते परंतु त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली . काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभागृह नेते रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, भूषण पाटील, हितेंद्र पाटील उपस्थित होते.