उल्हासनगरातील नेताजी चौकात मालवाहू टेम्पो उलटला, रस्त्यातील खड्डे भरतात मोठ्या दगडाने, अपघाताची शक्यता
By सदानंद नाईक | Published: September 20, 2022 04:18 PM2022-09-20T16:18:33+5:302022-09-20T16:20:18+5:30
उल्हासनगर पूर्वेतील वर्दळीच्या नेताजी चौकात रस्ते खड्डेमय झाले असून मोटरसायकल पडून नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार दररोज होत आहेत.
उल्हासनगर: संततधार पावसाने बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून खड्डे मोठ्या दगडाने भरले जात असल्याने, अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे सोमवारी सायंकाळी नेताजी चौकात एक मालवाहू टेम्पो उलटल्याने, टेम्पोसह साहित्याचे नुकसान झाले.
उल्हासनगर पूर्वेतील वर्दळीच्या नेताजी चौकात रस्ते खड्डेमय झाले असून मोटरसायकल पडून नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार दररोज होत आहेत. सोमवारी सायंकाळी एक मालवाहू टेम्पो चौकातून जात असताना रस्त्यातील खड्यामुळे टेम्पो उलटी होऊन टेम्पोतील सामान रस्त्यावरील चिखलात पडले होते. नागरिकांनी एकत्र येऊन पलटी झालेला टेम्पो सरळ करून खाली पडलेले सामान टेम्पोत ठेवण्यास नागरिकांनी मदत केली. संततधार पावसाने डांबरीकरणाचे रस्ते उखळले असून सिमेंट काँक्रीटचे रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र शहरात आहे.
नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, तहसीलदार कार्यालय रस्ता, मोर्यानगरी रस्ता, गुरुनानक स्कुल रस्ता, संभाजी चौक ते पाच दुकान रस्ता, कैलास कॉलनी रस्ता, खेमानी रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रस्ता अश्या बहुतांश रस्ते खड्डेमय झाली आहे.
शहर पूर्व व पश्चिमेला जोडणारा छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर खड्डेच खड्डे झाले. महापालिकेने मंगळवारी सकाळी खड्डे मोठ्या दगडांनी भरल्याने मोटरसायकली, ऍक्टिवा गाडी पडून नागरिक जखमी होत आहेत. मोठ्या दगडाने रस्त्यातील खड्डे भरणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्या सारखे आहे. असे आयुक्त अजीज शेख यांनी यापूर्वी सांगितल्यावरही बांधकाम विभाग मोठ्या दगडाने रस्त्यातील खड्डे भरत असल्याने, नागरिक व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला खड्डे पडल्याने, रस्ता बांधणीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. या प्रकाराने संबंधित अधिकारी व ठेकेदारावर निकृष्ट रस्त्याची बांधणी केल्याबाबत कारवाईची मागणी होत आहे. तर आयुक्त अजीज शेख यांनी पावसाने उघडीस घेतल्यास, रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरवाटनकारण्याचे संकेत दिले.
८ कोटी रुपये गेले कुठे?
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रभाग समिती निहाय्य ८ कोटीच्या निधीला मंजूर दिली होती. काही रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी बांधकाम विभागाने केली होती. रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरलेच नाहीतर, पैसे गेले कुठे ? असा प्रश्न विचारला जात आहे.