अट्टल चोरांची चौकडी ठाण्यात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:41 AM2018-01-20T01:41:03+5:302018-01-20T01:41:06+5:30
सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाºया चार अट्टल चोरांच्या टोळीस ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. या आरोपींनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आले
ठाणे : सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाºया चार अट्टल चोरांच्या टोळीस ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. या आरोपींनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याजवळून सुमारे १0 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी येथील पिराणीपाड्यातील यदुल्ला कबरलअली जाफरी (२६) आणि महम्मदअली नादरअली जाफरी (२३) या इराणी आरोपींना मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ३0 डिसेंबर २0१७ रोजी अटक केली होती. नारपोली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात ते सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या चोरीच्या मोटारसायकलचा वापर आरोपींनी सोनसाखळी चोरीसाठी केला. नौपाडा, कासारवडवली, कापूरबावडी, डोंबिवली आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. या गुन्ह्यांमधील ५ लाख ९४ हजार रुपयांचे सोने आणि २ लाख ४४ हजार रुपयांच्या तीन मोटारसायकल आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. याशिवाय दोन अट्टल घरफोड्यांनाही पोलिसांनी अटक केली. अनुराग रवी सिसोदीया (२५) आणि कलीम नवाब अहमद खान (३0) ही आरोपींची नावे असून, दोघेही डायघरचे रहिवासी आहेत. या आरोपींनी शीळ डायघर, खडकपाडा, कोळसेवाडी, अंबरनाथ, मानपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७ घरफोड्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांमधील १ लाख ५३ हजार रुपयांचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चारही आरोपींकडून ९ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मालमत्ता गुन्हे कक्षाच्या ठोस कारवाईमुळे गतवर्षी चोºयांचे प्रमाण तुलनेनी कमी झाले. याशिवाय मालमत्ताविषयक गुन्हे
उघडकीस आणण्याचे प्रमाण
57 टक्क्यांनी वाढले.