अटलजींचा भाव देशाला परमवैभवापर्यंत नेऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:00 AM2018-12-26T04:00:26+5:302018-12-26T04:01:11+5:30
देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे हा जो भाव अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे.
ठाणे : देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे हा जो भाव अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे. तो घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा परमवैभवापर्यंत नेऊ शकतो, असा आशावाद मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंत्ती निमित्त भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी स्वरवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भावना यावेळी व्यक्त केली. भरी दोहपहरी मे अंधियारा... सुरज परछाईसे हारा...अंतर तमका नेह निचोडे, बुझी हुई बाते सुलगाये... आओ फिर से दिया जलाये... आओ फिर से दिया जलाये अशी अटलजींच्या कवितेच्या ओळी सादर करून पुन्हा परमवैभवापर्यंत नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
देशाला एक दिशा देण्याचे काम अटलींजीनी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. कवी मनाचे अटलीजी कोमल हृदयाचे होते. परंतु, देशासाठी संकटे आल्यास ते कठोर निर्णय घेण्यासही मागे पुढे पाहत नव्हते. ज्या वेळेस देशाला हिंदू ग्रोथ रेट म्हणून हिणवले जात होते, त्यावेळेस अटलीजींनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखी बळकट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.