आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!
By सुरेश लोखंडे | Updated: December 11, 2023 16:10 IST2023-12-11T16:07:53+5:302023-12-11T16:10:16+5:30
आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासह जगभरातील २२ विविध देशांतील अनेक नामवंत कराटेपटुंनी सहभाग घेतला.

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!
सुरेश लोखंडे,ठाणे : कौलालंपूरख् मलेशिया येथे तीन दिवशीय ८ वी महापौर आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा अलिकडेच पार पडली. या स्पर्धेत भारतासह जगभरातील २२ विविध देशांतील अनेक नामवंत कराटेपटुंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भारतातील अनेक राज्यांच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत आपल्या महाराष्ट्रातून यश मारवाडी यांनी सुवर्णपदक व कल्याणचे आदर्श युवा अजित कारभारी यांनी रजत पदक पटकावून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवले आणि आपल्या भारताचा तिरंगा डौलाने फडकवला.कराटे प्रशिक्षक संतोष तलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला ०१ सुवर्ण व ०१ रजत पदक प्राप्त झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेतील ठाणे,कल्याणमधील यश मारवाडी व अजित कारभारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात असल्याचे येथील श्रीरंग हायस्कूलचे शिक्षक सुनील म्हस्कर यांनी लाेकमतला सांगितले.