ATM सेफ्टी डुअर अन् पासवर्ड किटची तोडफोड, पैसे लुटण्याचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 05:12 PM2021-01-02T17:12:02+5:302021-01-02T17:12:41+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केट परिसरातील सतरामदास हॉस्पिटल जवळ अक्सिस बँकेचे एटीएम आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी एटीएम फोडून पैशे लुटण्याचा प्रयत्न केला.

ATM security door and password kit vandalized, attempted robbery failed | ATM सेफ्टी डुअर अन् पासवर्ड किटची तोडफोड, पैसे लुटण्याचा प्रयत्न फसला

ATM सेफ्टी डुअर अन् पासवर्ड किटची तोडफोड, पैसे लुटण्याचा प्रयत्न फसला

Next
ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केट परिसरातील सतरामदास हॉस्पिटल जवळ अक्सिस बँकेचे एटीएम आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी एटीएम फोडून पैशे लुटण्याचा प्रयत्न केला.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ सतरामदास हॉस्पिटल येथील अक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न नविन वर्षाच्या मध्यरात्री झाला. चोरट्यानी सेफ्टी डोअर, मशीन शटर व पासवर्ड कोडची फोडतोड केली असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केट परिसरातील सतरामदास हॉस्पिटल जवळ अक्सिस बँकेचे एटीएम आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी एटीएम फोडून पैशे लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यानी एटीएम शटर, सेफ्टी डोअर व पासवर्ड किटची तोडफोड करून ६० हजारा पेक्षा जास्तकिमतीच्या साहित्याचे नुकसान केले. एटीएमची तोडफोड व लुटण्याचा प्रकार विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून एटीएम सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे.

Web Title: ATM security door and password kit vandalized, attempted robbery failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.