काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:01 AM2018-12-03T03:01:25+5:302018-12-03T03:01:39+5:30

काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिची पावणेदोन लाखांची फसवणूक करणारा भोंदूबाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

Atrocities against women in the name of impersonation of black magic | काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

Next

ठाणे : काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिची पावणेदोन लाखांची फसवणूक करणारा भोंदूबाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दहीसर पूर्व भागात राहणारी ही महिला तिच्या एका नातेवाइकाच्या ओळखीने ठाण्यातील दुसरी राबोडीतील कोकणी कबरस्तान, कोळीवाडा भागातील नूर शेख या भोंदूबाबाकडे २०१५ मध्ये गेली होती. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तुमच्यावर काळी जादू झाली आहे. ती उतरवण्यासाठी काही खर्च करावा लागेल, असे सांगून या विवाहितेकडून एक लाख ४८ हजार रुपये त्याने घेतले. तर, तिच्या आईकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर, तुझ्यावर सासू आणि नणंदेने काळी जादू केली असून ती उतरवण्यासाठी नूर बाबा सांगतील तसे कर, असे त्याची पत्नी रुबीना हिने या महिलेला बतावणी केली. त्यानुसार, तो या महिलेवर २०१५ ते नोव्हेंबर २०१८ या तीन वर्षांच्या काळात लैंगिक अत्याचार करत होता. तिने या प्रकाराला नकार दिल्यानंतर रुबीनाने आपल्याच पतीने केलेल्या घृणास्पद प्रकाराचे नकळत व्हिडीओ चित्रण केल्याचे सांगून तिला पुन्हा तसेच करण्यास भाग पाडले.
या भोंदूबाबाने आणि त्याच्या पत्नीने अत्याचाराची परिसीमा गाठल्याने अखेर याप्रकरणी या पीडित विवाहितेने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नोव्हेंबर रोजी रुबीनाला, तर १ डिसेंबर रोजी नूर शेख याला अटक केली.
>हे चित्रण व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून आणखी ५० हजार रुपये त्यांनी घेतले. तरीही, हा व्हिडीओ व्हायरल करून या महिलेचा पती, मुले आणि आईला ठार मारण्याचीही त्यांनी धमकी दिली.

Web Title: Atrocities against women in the name of impersonation of black magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.