आदिवासींची जमीन बळकावणाऱ्या बड्या विकासकासह ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 06:42 PM2021-01-16T18:42:13+5:302021-01-16T18:42:56+5:30

सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी तारवी यांनी केली होती .

Atrocity case filed against 9 persons including big developer who grabbed tribal land | आदिवासींची जमीन बळकावणाऱ्या बड्या विकासकासह ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

आदिवासींची जमीन बळकावणाऱ्या बड्या विकासकासह ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next

मीरारोड - मीरारोड मधील ७ हजार ६३६ चौ . मी . इतका भूखंड आदिवासींचे संरक्षित कुळ असताना बनावट कागदपत्रांच्या मार्फत बळकावून त्यावर इमारती बांधून लोकांना विकणाऱ्या युनिक शांती ह्या विकासकासह एकूण ९ जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शांता शिनवार तारवी ह्या आदिवासी समाजातील महिलेच्या फिर्यादी वरून जमीन मालक चंद्रकांत नवलकर , प्रकाशिनी नवलकर , रश्मी नवलकर , शिल्पा तळपदे व जमीन घेणार विकासक दिलेश शाह , जितेंद्र दोषी , हर्षद दोषी, मधू दोषी, शरदचंद दोषी ह्या ९ जणांवर गेल्या वर्षी २७ ऑक्टॉबर रोजी गुन्हा दाखल झालेला होता. परंतु सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी तारवी यांनी केली होती .

अखेर शुक्रवारी ह्या प्रकरणी पोलिसांनी सरकारी अभियोक्ता यांच्या अभिप्राया नुसार ह्या सर्व आरोपींवर ऍट्रॉसिटी कायद्या खाली सुद्धा गुन्हा दाखल केला आहे . ह्या प्रकरणात अजून पर्यंत एकही आरोपीला काशीमीरा पोलिसांनी अटक केलेली नाही .

शांता यांचे आजोबा सोमऱ्या जाधव यांची जुना मौजे मीरे सर्वे क्र . २२६ तथा नवीन मौजे पेणकरपाडा येथील सर्वे क्र . ५८/१ मधील जमिन कसत असल्याने संरक्षित कुळ म्हणून नोंद होती . त्यांचे वारस म्हणून १९८२ मध्ये वारसदारांची नोंद केली गेली . शांता यांची आई १९८९ मध्ये मरण पावल्याने वारस म्हणून शांता सह अन्य वारसदारांची नावे लागली . सदर जमिनीचे एकूण क्षेत्र २५, ५०९ चौ. मी . असून त्यातील ७६३६ चौ . मी . इतके क्षेत्र शांता यांच्या कुटुंबियांच्या हक्कात आहे .

तसे असताना २००७ साली पालिकेने सदर जमिनीवर बांधकाम परवानग्या देऊन बांधकामे सुरु झाली असल्याचे कळल्याने या प्रकरणी माहिती घेऊन तक्ररी सुरु केल्या . त्या वेळी आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे व अंगठे उमटवून खोटे हक्कसोड पत्र , विक्री करार आदी तयार केले. शांता ह्या सही करत असताना त्यांचा अंगठा करारावर असल्याचे नमूद केले . विकासक व जमीनमालक यांनी संगनमताने अन्याय व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता .

Web Title: Atrocity case filed against 9 persons including big developer who grabbed tribal land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.