सांकेतिक भाषा कळल्याने एटीएस सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:18 AM2019-01-25T04:18:19+5:302019-01-25T04:18:28+5:30
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील औरंगाबाद युनिटच्या अधिकाऱ्यांना ‘इसिस’शी संबंधित कारवाया मुंब्रा आणि औरंगाबाद येथून सुरू असल्याची माहिती खब-यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी मिळाली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकातील औरंगाबाद युनिटच्या अधिकाऱ्यांना ‘इसिस’शी संबंधित कारवाया मुंब्रा आणि औरंगाबाद येथून सुरू असल्याची माहिती खब-यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी मिळाली. त्यामुळेच एटीएसची पथके सतर्क झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद एटीएस पथकातील पोलीस निरीक्षक विजयत जैस्वाल यांना एका खास खबºयाने २६ जानेवारी २०१९ रोजीच्या आसपास ‘इसिस’शी संबंधित असलेले एक टोळके घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. केंद्रातील गुप्तचर यंत्रणा, राष्टÑीय तपास यंत्रणा सतर्क झाली. मुंब्रा आणि औरंगाबाद येथील संशयितांमध्ये जे संभाषण होत होते, त्याची पडताळणी केली जात होती. २७ डिसेंबर २०१८ रोजी जमान खुटेउपाड याने सलमान खानला संदेश पाठविला. यामध्ये म्हटले की, इमारतीच्या गच्चीवर सुकविण्यासाठी ठेवलेले ‘मटेरियल’ हाताळताना हॅन्डग्लोव्हज-मास्कचा वापर करावा’, याचा नेमका अर्थ खबºयांकडून एटीएस पथकांनी जाणून घेतला. त्यातूनच या संशयितांकडे घातक रसायनांसह इतर स्फोटक सामग्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २२ जानेवारीला एटीएसच्या अधिकाºयांनी मुंब्य्रात पाच ठिकाणी छापा टाकला. तसेच खान याच्यासह इतरांच्या घरातून मिळालेल्या रसायन आणि सफेद पावडरची न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी सुरू आहे.