‘गोंधळ का घालता’ म्हणताच आईसह, बहीण-भावावर हल्ला, ठाण्यातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:45 AM2024-04-17T08:45:09+5:302024-04-17T08:45:47+5:30
लक्ष्मण मोरे यांनी त्यांची रिक्षा १५ एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रिक्षात बसून गोंधळ घालणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या कमल मोरे (६४) आणि त्यांची मुलगी रेखा मोरे, तसेच मुलगा लक्ष्मण या बहीण-भावावर प्रेम मगरे याच्यासह तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण मोरे यांनी त्यांची रिक्षा १५ एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभी केली होती. त्याचवेळी त्यांच्या रिक्षामध्ये बसून प्रेम, आकाश पोटफोटे आणि बबलू पोटफोटे हे तिघे आरडाओरडा करीत होते.
त्यावर कशाला आरडाओरडा करता, असा जाब लक्ष्मण यांची आई कमल यांनी विचारला. याचाच राग आल्याने तिघांपैकी बबलू याने रस्त्यावरील लाकडी बांबूने कमल यांच्या डोक्यावर प्रहार केला. ही भांडणे सुरू असताना त्यांची दिव्यांग मुलगी रेखा हिने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिलाही प्रेम आणि आकाश यांनी हाताच्या चापटीने मारहाण केली.