ठाण्यात शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला: चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:08 PM2020-09-25T22:08:01+5:302020-09-25T22:25:30+5:30

ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसायकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दीपक परब यांनाही त्यांनी मारहाण केली. या घटनेने पालिका वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

Attack on Shiv Sena group leader's vehicle in Thane: Driver beaten | ठाण्यात शिवसेना गटनेत्याच्या वाहनावर हल्ला: चालकाला मारहाण

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसायकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दीपक परब (४०, रा. लोकमान्यनगर पाडा क्रमांक दोन, ठाणे) यांनाही त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास सावरकरनगर येथील रवीची माता सर्कलजवळून बारटक्के यांच्यासह ते मोटारकारने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन तिघेजण आले. परब यांनी त्यांना मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले. याचाच राग आल्याने त्यांनी बारटक्के यांच्या कारवर लाथा मारुन कारची मागची काचही फोडली. त्यानंतर परब यांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करीत दमदाटीही केली. यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून हल्ल्यात परब यांना मार लागला आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख महेश लोखंडे, शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर आणि विजय देवळेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत हा वाद सोडविला. दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

Web Title: Attack on Shiv Sena group leader's vehicle in Thane: Driver beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.