ठाण्यातील वॉटर पार्क व्यवस्थापकाला मारहाणप्रकरणी मनसेच्या १५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:13 PM2018-12-03T20:13:34+5:302018-12-03T20:21:17+5:30

दोन मराठी कामगारांना कामावरुन काढल्याचा जाब विचारत ठाण्यातील सूरज वॉटर पार्कमधील सीसीटीव्हींची मोडतोड करीत यवस्थापक लक्ष्मण कटींना मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Attack on Thane water park manager: crime against 15 people of MNS | ठाण्यातील वॉटर पार्क व्यवस्थापकाला मारहाणप्रकरणी मनसेच्या १५ जणांविरुद्ध गुन्हा

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा समावेश

Next
ठळक मुद्देजिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा समावेशदोन मराठी कामगारांना काढल्याचा रागकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: दोन मराठी कामगारांना कामावरुन तडकाफडकी काढल्याचा जाब विचारुन सूरज वॉटर पार्कचे व्यवस्थापक लक्ष्मण कटी यांना मारहाण करणारे मनसेचेठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कमधील शिवाजी हेलाले आणि पुरंदर पाटील या दोन मराठी कामगारांना कामावरून अलिकडेच काढले होते. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखालील १५ ते २० कार्यकर्ते 30 नोव्हेंबर रोजी सूरज वाटर पार्क येथे गेले होते. त्यावेळी ‘आमच्या माणसांना काढता तुम्ही’ असे म्हणत त्यांनी सूरज वाटर पार्कच्या कार्यालयात तोडफोड केली. सीसीटीव्हीचीही तोडफोड करीत व्यवस्थापक कटी यांच्या श्रीमुखात लगावली. शिवाय त्यांना बघून घेण्याची धमकीही दिली. याप्रकरणी वाटर पार्कचे पर्यवेक्षक सागर यादव यांनी रविवारी (१ डिसेंबर रोजी) कासारवडवली पोलीस ठाण्यात मारहाण आणि धमकी दिल्याची अविनाश जाधव, मंजुळा डाकी आदींसह २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

‘‘ सूरज वॉटर पार्कच्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याच्या मुद्दयावरुन अविनाश जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी व्यवस्थापकाला जाब विचारत मारहाण केल्याचा गुन्हा रविवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे.’’
अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट, परिमंडळ ५
 

Web Title: Attack on Thane water park manager: crime against 15 people of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.