गोकुळाष्टमीला जाण्यास मज्जाव केल्याने पत्नीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:14 AM2019-08-25T00:14:38+5:302019-08-25T00:14:42+5:30

उत्सवाला गालबोट । राबोडी पोलिसांत पतीविरोधात गुन्हा

Attack on wife forbidding him to go to Gokulasthami | गोकुळाष्टमीला जाण्यास मज्जाव केल्याने पत्नीवर हल्ला

गोकुळाष्टमीला जाण्यास मज्जाव केल्याने पत्नीवर हल्ला

Next

ठाणे : गोकुळाष्टमी सणाला मित्रांसोबत जाऊ नकोस, याचा राग मनातून डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीवर गोळ्या कुटण्याच्या लोखंडी मुसळीने हल्ला केल्याची घटना शुक्र वारी ठाण्यात घडला. रूपाली (२७) असे जखमी पत्नीचे नाव, तर गोविंदा निगुडकर असे पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.


याप्रकरणी पत्नीच्या तक्र ारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील खोपट परिसरात हे डॉक्टर दाम्पत्य राहत असून विवाह झाल्यानंतर २ आॅगस्ट २०१९ रोजी घरगुती कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्यावेळी रूपाली यांनी राबोडी पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरु द्ध तक्र ार दाखल केली होती.


त्यानंतर २३ आॅगस्ट रोजी गोकुळाष्टमी असल्याने रूपालीने पती गोविंदा यांना गोकुळाष्टमी सण असल्याने बाहेर आपल्या मित्रांसोबत कुठे जाऊ नकोस, अशी विनवणी केल्याचा रागातून गोविंदा याने पत्नीला शिवीगाळ करून ठोशाबुक्कयाने मारहाण केली. तसेच गोळ्या कुटण्याच्या लोखंडी मुसळीने त्याने तिच्या कपाळावर मारून दुखापत केल्याप्रकरणी शुक्र वारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

Web Title: Attack on wife forbidding him to go to Gokulasthami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.