मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:58 AM2017-12-06T00:58:24+5:302017-12-06T00:58:34+5:30
येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसºया मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
ठाणे : येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसºया मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या बंडू सोनावणे याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार करण्यात येत असन फरार हल्लेखोर सलमान याचा शोध सुरू आहे. तर जखमी बंडूची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.
चाळीसगाव येथील मूळ रहिवाशी असलेला जखमी बंडू सोनावणे आणि फरार हल्लेखोर सलमान हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर राहत. दोघेही मिळेल ते काम करीत. शनिवारी दोघांनी एकत्र रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, त्याचे बिल फरार सलमान यानेच दिले होते. शनिवारी रात्री झोपण्यावरून त्यांच्यात जागेवरून वाद झाला. बंडूने सलमानला झोपण्यास विरोध केल्याने त्याने दारूच्या नशेत त्याच्यावर रागाच्या भरात कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला सीएसटीकडील एक नंबर फलाटाच्या १०० मीटर पुढे कोपरी येथे घडला. यावेळी हल्लेखोराने डोक्यावर आणि हातावर हल्ले करून तेथून पळून काढला. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत बंडू हा फलाट क्रमांक दोन येथील ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आला. रक्ताने माखलेले पाहून त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डोक्यावर झालेल्या हल्ल्याचे घाव लक्षात घेऊन तातडीने त्याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात हलवले. तसेच याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासात त्यांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील सीसीटीव्ही कॅमेºयामुळे हल्लेखोर सलमानची ओळख पुढे आले आहे. तसेच त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.