भाईंदर मधील अट्टल चोरट्यास केले ४ जिल्ह्यातून हद्दपार
By धीरज परब | Published: December 23, 2023 01:39 PM2023-12-23T13:39:37+5:302023-12-23T13:39:47+5:30
१९ वर्षाचा असलेला ओम विक्रम सांळुखे हा भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर मधील साईराज इमारतीत राहतो .
मीरारोड - ५ गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा ओम विक्रम सांळुखे ह्याला ठाणे , पालघर , मुंबई व मुंबई उपनगर ह्या ४ जिल्ह्यातून ६ महिन्या करता हद्दपार केले आहे .
१९ वर्षाचा असलेला ओम विक्रम सांळुखे हा भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर मधील साईराज इमारतीत राहतो . नवधर पोलीस ठाणे येथे ४ व नायगाव पोलीस ठाणे येथे १ असे एकुण ५ चोरीच गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत . साळुंखे मुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण होवुन त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असल्यामुळे त्याला मुंबई पोलीस कायदा कलम प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठांना सादर करण्यात आला होता .
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी आदेश काढून साळुंखे ह्याला ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या ४ जिल्हा कार्यक्षेत्रातुन ६ महिन्या करता हद्दपार केले आहे. उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक विशाल धायगुडे, उपनिरीक्षक तुषार माळोदे सह कुमार राठोड यांनी ओम साळुंखे याला हद्दपार करण्याची कार्यवाही केली .