आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:10 PM2020-06-25T16:10:15+5:302020-06-25T16:11:12+5:30

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली.

Attempt to cut off Eknath Shinde's wings behind the transfer of Commissioner - Praveen Darekar | आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर 

आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर 

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे, वसई विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागात १३ जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगत त्यांनी या सर्व महापालिका क्षेत्राचा आढावा मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे : सर्वच ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्याला  आयुक्त बदलणे हा उपाय नव्हे, अशा पद्धतीने शिपायांच्या देखील बदल्या करण्यात येत नाहीत. या सर्व बदल्यांमध्ये मोठे गौडबंगाल असून मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख छाटन्याच्या हा प्रयत्न तर नाही ना? असा आम्हाला संशय असल्याचे खळबळजनक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात केले आहे. 

आयुक्त बदलून विषय सुटत नसून आपण तशाप्रकारची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, पुरेसे मन्युष्यबळ उभे करणे आवश्यक आहे, तीन महिने जेव्हा एखादा आयुक्त संपूर्ण यंत्रणा उभी करतो आणि लोकांचे आरोप झाले किंवा यंत्रणा कोलमडली की त्यांच्या जागी नवी आयुक्त आणणे हे योग्य नसून नवीन आयुक्तांना पुन्हा समजून घेण्यास वेळ लागतो असा आरोप दरेकर यांनी केला आहे. 

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली. तसेच पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आयुक्तांच्या बदल्यांबाबत महत्वाचे विधान केले आहे. ठाणे जिल्ह्यात चार महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या असून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या बदल्या करण्यात आल्या असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र दरेकर यांनी आयुक्तांच्या बदल्यांचे समर्थन केले नसून आयुक्तांच्या बदल्या करणे हा त्यामागचा उपाय नसल्याचे त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे यांनी काही आयुक्तांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र नगरविकास खात्यांचे मंत्री असताना त्यांना न कळवता मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत नाही ना? अशी आमच्या मनात दाट शंका असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 

ठाणे, वसई विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या भागात १३ जूनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगत त्यांनी या सर्व महापालिका क्षेत्राचा आढावा मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. हे रोखण्यामध्ये सरकार अक्षरशः अपयशी ठरले असून पालिका यंत्रणा देखील अपयशी ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही. प्रशासन आणि यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात केवळ हॉस्पिटल उभारून उपयोग नाही तर त्यात स्टाफच नसेल तर फायदा काय? यासाठी राज्यशासनाकडे सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

गोपीचंद पडळकर स्पष्टीकरण देतील... 
गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य ही पक्षांची भूमिका नव्हती. एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कालच देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात पडळकर स्पष्टीकरण देणार असून त्यांनतर देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते पक्षाची भूमिका मांडतील असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Attempt to cut off Eknath Shinde's wings behind the transfer of Commissioner - Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.