जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न- अमोल मिटकरी

By पंकज पाटील | Published: April 17, 2023 06:03 PM2023-04-17T18:03:02+5:302023-04-17T18:03:20+5:30

हे सरकार फार दिवस टिकणार नसून तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Attempt to break NCP by deliberate pressure says Amol Mitkari | जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न- अमोल मिटकरी

जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न- अमोल मिटकरी

googlenewsNext

बदलापूर : जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. सोबतच हे सरकार फार दिवस टिकणार नसून तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मान्य केला आहे. हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत मिटकरी यांना विचारके असता ज्या अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात, असं म्हणत अजित दादा हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आत्ता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाही.

हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. राज्यातले सध्याचे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसल्याचाही दावा त्यांनी केला. आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही आणि राज्यात लवकरच एक नवीन महाविकास आघाडीचेसरकार येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले. राज्यात शेतकरी अडचणीत असून अकोला जिल्ह्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. मात्र कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही पंचनामे करण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार जर राम राज्याची वल्गना करत असेल, तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Attempt to break NCP by deliberate pressure says Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.