उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

By जितेंद्र कालेकर | Published: March 26, 2023 06:56 PM2023-03-26T18:56:13+5:302023-03-26T18:56:22+5:30

मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, हल्लेखोर पसार.

Attempt to burn disabled passenger in suburban train on Mumbra railway station: Attackers escape | उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

ठाणे: मुंब्रा स्थानकात उपनगरी रेल्वे आल्यावर एका गर्दुल्या दिव्यांगाने पेटता रुमाल दिव्यातील प्रमोद वाडेकर (३४) या अन्य एका दिव्यांग सहप्रवाश्याच्या अंगावर फेकल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमध्ये वाडेकर यांचे दोन्ही हात होरपळले असून त्यांना मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोर गर्दुल्ला पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यातील रहिवाशी असलेले वाडेकर हे पवईतील एका हॉटेलमध्ये नोकरीला आहेत. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कांजूरमार्ग येथे छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) ते कल्याण या उपनगरी रेल्वेतून घरी येत होते. तर फरार हल्लेखोर हा आधीपासूनच दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होता. शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे मुंब्रा स्थानकात आली. त्यावेळी वाडेकर यांच्या अंगावर सोल्यूशनची नशा करीत असलेल्या एका दिव्यांगाने त्याच्याकडील रुमाल पेटवून फेकला. तो रुमाल वाडेकर यांच्या डाव्या हातावर पडला. आधी काय झाले हे वाडेकर यांच्या लक्षात आले नाही. तेंव्हा आग लागल्याचा प्रकार त्यांना अन्य एका सहप्रवाशाने निदर्शनास आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली. तर रुमाल फेकणाºयाने मुंब्रा रेल्वे स्थानकात उडी घेऊन पोबारा केला. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वाडेकर यांना दिवा रेल्वे स्थानकात उतरवून तातडीने त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कलम ३२६ नुसार ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.  हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, पसार दिव्यांगाला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती कांदे यांनी दिली.

Web Title: Attempt to burn disabled passenger in suburban train on Mumbra railway station: Attackers escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.