बावघर जंगलात गोहत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:59+5:302021-06-30T04:25:59+5:30
कसारा : शहापूर तालुक्यात बावघर जंगलात गोहत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. मात्र त्या व्यक्तींवर ...
कसारा : शहापूर तालुक्यात बावघर जंगलात गोहत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. मात्र त्या व्यक्तींवर वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे वनविभाग व प्रशासन विरोधात असंतोष पसरला आहे .
वनविभागाचे अधिकारी या विषयाला गांभीर्याने घेत नसल्याने शेरे, शेई येथील कर्मचाऱ्यांविरुद्ध शंभूदुर्ग प्रतिष्ठान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वासिंद पोलीस ठाण्यात निवेदन देऊन याप्रकरणी चौकशी करून संशयितांवर कारवाईची मागणी केली आहे. शहापूर वनविभागाच्या क्षेत्रातील शेरे, शेई बरोबरच काही भागातील मोकाट, मालकीची जनावरे चोरीला गेली असून स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान गोहत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शंभूदुर्गचे आदेश चौधरी तसेच अमोल ढलपे यांनी दिला आहे.