एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करून लुटीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:34 AM2018-05-29T01:34:03+5:302018-05-29T01:34:03+5:30

एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकांकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात

Attempted loot by pretending to be an ACB officer | एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करून लुटीचा प्रयत्न

एसीबी अधिकारी असल्याची बतावणी करून लुटीचा प्रयत्न

Next

ठाणे : एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) अधिकारी असल्याची बतावणी करून ठाण्यातील एका खासगी क्लासच्या शिक्षकांकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज प्रसाद याच्यासह पाच जणांच्या टोळक्याला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी दिली. या पाचही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाड्यातील वीर सावरकर मार्गावरील ‘एक्सेल कॉमर्स क्लासेस येथे २८ एप्रिल २०१८ रोजी आल्विन परवेज (३९, रा. ब्रह्मांड, घोडबंदर रोड, ठाणे) या शिक्षकाला मनोजकुमार प्रसाद (रा. वाहतूकनगर अंधेरी, मुंबई), मयूर राणे (रा. वाघबीळ, ठाणे), मिथिलेश मुखिया (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई), सुरज पवार (रा. सिद्धार्थनगर, अंधेरी, मुंबई) आणि मोहीत वर्मा (रा. वाहतूकनगर, अंधेरी) यांनी आपण एसीबीचे अधिकारी असून तुमच्याकडे रेड पडणार असल्याची बतावणी केली. ‘आमचे साहेब खाली गाडीत थांबले आहेत. तुम्ही खाली चला’, असे त्यांना धमकावले. आल्विन यांनी त्यांच्यासोबत जाण्यास विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्यापैकी काहींनी त्यांना मारहाणही केली. तिथे सीसीटीव्हीमध्ये चित्रण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या टोळीने तिथून पलायन केले होते. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, भागवत थविल, गोविंद पाटील, महेश भोसले आणि कॉन्स्टेबल गोरख पाटील आदींनी २७ मे रोजी पहाटे मोहित वर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मनोजकुमार प्रसाद याच्यासह चौघांना अटक केली. या शिक्षकाला एका वाहनातून नेऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा या टोळीची योजना होती, असेही तपासात उघड होत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मात्र, यातील सर्व बाजू तपासण्यात येत असल्याचे उपायुक्त स्वामी यांनी सांगितले.

Web Title: Attempted loot by pretending to be an ACB officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.