कटकारस्थान केल्याच्या संशयातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 07:10 PM2021-03-02T19:10:16+5:302021-03-02T19:11:54+5:30

कटकारस्थान केल्याच्या संशयातून प्रेमजित सिंग (३८, रा. चितळसर, ठाणे) याच्या खूनाचा प्रयत्न करणाºया राजेश कोंडविलकर (३४, रा. मनोरमानगर, ठाणे) या तडीपार गुंडाला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

Attempted murder arrested on suspicion of conspiracy | कटकारस्थान केल्याच्या संशयातून खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

तडीपार असूनही केला खूनी हल्ला

Next
ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाई तडीपार असूनही केला खूनी हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कटकारस्थान केल्याच्या संशयातून प्रेमजित सिंग (३८, रा. चितळसर, ठाणे) याच्या खूनाचा प्रयत्न करणाºया राजेश कोंडविलकर (३४, रा. मनोरमानगर, ठाणे) या तडीपार गुंडाला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
प्रेमजित हा आपल्याविरुद्ध कटकारस्थान करतो, असा राजेशला गेल्या काही दिवसांपासून संशय होता. याच संशयातून त्याने प्रेमजितच्या डोक्यावर आणि मानेवर मटण तोडण्याच्या सुºयाने जबर वार करुन खूनी हल्ला केला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे आणि उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने त्याला १ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अटक केली.
* जामीनावर सुटताच केला खूनी हल्ला-
राजेश याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे यापूर्वीच कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळेच त्याला ठाण्यातून तडीपार केले आहे. तरीही तो कापूरबावडी परिसरात फिरत असल्याचे आढळल्याने कापूरबावडी पोलिसांनी त्याला २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली होती. ठाणे न्यायालयाने मात्र त्याची २८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक जामीनावर मुक्तता केली. त्यानंतर दुसºयाच दिवशी त्याने हा खूनी हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Attempted murder arrested on suspicion of conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.