उल्हासनगरातील मुथुट फायनन्स बँकेवर चोरीचा प्रयत्न, गुन्हा दाखल, पथके लागले कामाला
By सदानंद नाईक | Published: July 24, 2023 09:50 PM2023-07-24T21:50:48+5:302023-07-24T21:51:22+5:30
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-१, संच्युरी कंपनी परिसरात असलेल्या मुथुट फायनान्स बँकेवर रविवारी रात्री चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, संच्युरी कंपनी परिसर मध्ये मुख्य रस्त्या शेजारी मुथुट फायनान्स बँक आहे. सोन्याच्या दागिन्यांवर याठिकाणी कर्ज मिळते. बँक शेजारीच लॉन्ड्रीचे दुकान आहे. चोरट्यांच्या रविवारी रात्री लॉन्ड्रीच्या दुकानात प्रवेश करून दुकानाच्या भिंतीला होल मारण्यात आले. मात्र बँकेच्या भिंतीला होल मारण्यात त्यांना जास्त वेळ लागल्याने, सकाळ झाली. त्यामुळे त्यांनी चोरी करण्यापूर्वी तेथून पळ काढला. लॉन्ड्रीचा दुकानदार सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर, चोरी करण्याचा सर्व प्रकार उघड झाला. त्याने उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे यांनी पोलीस पथकासह घटनेची पाहणी करून चोरीचा पर्यन्त झाल्याचा गुन्हा दाखल केला.
मुथुट फायनान्स बँकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचे दागिने असल्याच्या संशयावरून चोरीचा पर्यन्त झाला असावा. अशी शंका वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे यांनी व्यक्त केली. तसेच या तपासाची चक्रे जलद गतीने फिरविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. चोरटे लवकरच जेरबंद होतील. अशी आशा यावेळी फुलपगारे यांनी व्यक्त केली आहे.