हाजुरीत मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:03+5:302021-03-14T04:36:03+5:30
ठाणे : ठाणे महापालिका आणि महावीर जैन ट्रस्ट यांच्यातर्फे शनिवारी हाजुरी येथील जितो रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे नवे केंद्र सुरू ...
ठाणे : ठाणे महापालिका आणि महावीर जैन ट्रस्ट यांच्यातर्फे शनिवारी हाजुरी येथील जितो रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे नवे केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहरात लसीकरणाला वेग आला आहे. ठाणे महापालिकेतर्फे नागरिकांच्या सोईसाठी जास्तीत जास्त केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हाजुरी येथे वातानुकूलित, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व सर्व आरोग्याची काळजी घेण्यात येणारे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रात मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्घाटनप्रसंगी नगरसेविका नम्रता फाटक, मीनल संख्ये, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, ‘जितो’चे विश्वस्त अजय आशर, भरत मेहता, महेंद्र जैन, दीपक मेहता, पीयूष शहा आदी यावेळी उपस्थित होते.
------------------