बैठकीला मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधींची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:31+5:302021-06-23T04:26:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील खासगी शाळांकडून फीवाढीच्या संदर्भात शिवसेनेने मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेतली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील खासगी शाळांकडून फीवाढीच्या संदर्भात शिवसेनेने मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेतली. बैठकीला आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
उल्हासनगरातील खासगी शाळा व्यवस्थापन मनमानी पद्धतीने फी वाढवत असल्याच्या असंख्य तक्रारी शिवसेनेकडे आल्या होत्या. विद्यार्थी व पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून शिवसेनेला हस्तक्षेप करण्याची मागणी केली. आमदार किणीकर, महापौर अशान यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घेतली. यावेळी मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेऊन कोरोना काळातील नागरिकांची खरी परिस्थिती समजून दिली. तसेच बैठकीत शाळांची फीवाढ रोखण्यात येऊन फी न भरल्याने एकाही विद्यार्थ्याला तसेच ज्या विद्यार्थ्यांची फी भरण्याची क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांबाबत माणुसकीच्या भावनेने विचार करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशा सूचना शिक्षण संस्थाचालकांना दिल्या. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत, शिक्षण प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते आदीजन उपस्थित होते.